सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला

0

जळगाव । प्रतिनिधी

शहरातील अनके भागात घरफोडयांच्या प्रमाण दिवस दिवस वाढ होत आहे. आज  पुन्हा मेहरूण परिसरातील एक सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी घरफोडी  झाल्याचे  समोर आले आहे. या घरफोडीत  चोरट्यांनी ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

गणेशपुरी परिसरात राहणारे युनुस कालु खान वय-६४ हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. दि.१२ जुलै रोजी ते पत्नीसह मुलाच्या घरी ठाणे येथे गेले होते. बुधवारी सकाळी ६.३० वाजता ते घरी आले असता घराबाहेरील कंपाऊडला कुलुप लावलेले होते. ते उघडून आत गेले असता घराचे मेन दरवाजाचे कुलुप लावलेली कडी तुटलेली दिसली.

चोरट्यांनी घरातील कपाट फोडून ४० हजार रोख, १२ हजारांची सोन्याची चेन, १२ हजारांचे कानातले व अंगठी असा ६४ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.