सूरत अग्नितांडवातील मृतांचा आकडा 20 वर पोहोचला

0

सूरत :- गुजरात राज्यातील सुरतमधील सरथाणा परिसरात असलेल्या तक्षशिला नावाच्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत २० विद्यार्थांच्या मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याचा तपास सूरत क्राइम ब्रांचकडे सोपविला आहे.

काल शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तक्षशीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही भीषण आग लागली होती. या इमारतीत चौथ्या मजल्यावर एक कोचिंग क्लास घेण्यात येत होता. याच कोचिंग क्लासमध्ये ही आग लागली होती. जीव वाचविण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या. त्यात यात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. इमारत आग प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कोचिंग क्लासेसच्या दोन संचालकांना अटक केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सूरत क्राइम ब्रांचकडे सोपविला आहे.



गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सदर आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून आगीत मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुंटुंबियाना आर्थिक मदत म्हणून 4 लाख रूपये देण्याचे घोषित केले आहे. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही  आगीच्या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून स्थानिक प्रशासनाला मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.