सुस्वभावी व्यक्तीमत्व हरपले ! दोधवद हायस्कुलचे उपशिक्षक प्रशांत देसले यांचे निधन

0

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील दोधवद येथे कार्यरत असलेले उपशिक्षक प्रशांत भाऊराव देसले (वय ४३) रा.तुकाराम वाडी, पिंपळे रोड ,अमळनेर यांचे आज दि.२४ सोमवारी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

ते नियमित माॅर्निग वाॅकसाठी जात असत.नेहमीप्रमाणे आज पहाटे ५.२५वा फिरायला गेले असता, घरी परततांना अचानक, पावणे सहा वाजेच्या दरम्यान ह्रदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते जागेवरचं कोसळले . एक मितभाषी, संयमी, मनमिळावू ,सुस्वभावी व्यक्तीमत्व हरपले .
धनदाई संस्था तसेच परिवारावर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने पंचक्रोशीत, दोधवद गावात हळहळ व्यक्त होत आहे.पश्चात पत्नी ,२ मुली ,भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.