सिंधी साहित्य अकादमीच्या उपसमित्या गठीत

0

अध्यक्ष डॉ.गुरूमुख जगवानी यांच्या अध्यक्षतेखाली निवड

मुंबई :- महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ.गुरूमुख जगवानी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक पु.ल.देशपांडे अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडली. यावेळी समितीच्या चार उपसमित्यांचे गठन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी डॉ.गुरूमुख जगवानी यांची निवड झाल्यानंतर इतर सदस्यांची देखील नुकतेच निवड करण्यात आली होती. मुंबई येथे बुधवारी अकादमीची पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये सर्वप्रथम सर्व सदस्यांचा परिचय करण्यात आला. त्यानंतर सन 2019-20 वर्षासाठी पुरस्कार समारंभ आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून चार उपसमितींचे गठन करण्यात आले.

डॉ.गुरूमुख जगवानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला समितीचे सदस्य सचिव सं.व.निंबाळकर, समिती सदस्य माजी आ.कुमार अयलानी, किशन असुदानी, डॉ.गोविंद तुमसर, वीरू बुलानी, महेश तेजवानी, मुरली अदनानी, मोहन मंजनानी, नीतू करीया, विजय लखानी, दीपक वाटवानी, काजल मूलचंदानी, डॉ.मूलचंद उदासी, रतन चावला, मनोजकुमार सैनी, काजल रामचंदनानी, डॉ.संध्या कुंदनानी, शोभा लालचंदानी, जीतू जगवानी, सुंदर दगवानी, गिरीष रोहिरा, सुरेश कुंदनानी, रितू रायसिंघानी, रमेश तनवानी, भारती मोटवानी, धामू भटेजा, जमनादास पुरसवानी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.