सामाजिक जाणिवेतून वाढदिवस साजरा

0

भातखंडे (प्रतिनिधी) : अमेय अनिल अग्रहारकर यांच्या २७ व्या  वाढदिवसानिमित्त नवदाप्त-  प्रतिक्षा  कोळपे यांच्या वतीने  विविध सामाजिक उपक्रम राबविले लोणी काळभोर तीर्थक्षेत्र रामदरा केसकर वस्ती येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला या मध्ये वड,पिंपळ, गुलमोहर, कदंब, अशा विविध औषधी  व जंगली वृक्षांचे ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड ,जंगलाचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. आता कोरोणा रूग्ण ऑक्सिजन न मिळाल्याने आपले मोलाचे जिवन संपवत आहे ऑक्सिजन बेड साठी नातेवाईक दिवस रात्र फिरत आहेत तरी देखिल बेड मिळत नाही. खुप मोठे संकट भारतात या संकटावर लवकरच मात करेल सर्व नागरिकांकडून सरकारच्या नियमाचे पालन जरुरीचे आहे. आपल्या देशाला बाहेरील देशातून ऑक्सिजन मागवण्यात येत आहे . सर्व भारतीय नागरिक यांनी ग्रीन फाउंडेशन सोबत वृक्ष संवर्धन मोहीम मध्ये उतरले तर संपूर्ण जगला भारत ऑक्सिजन पुरवेल येवढी क्षमता भारता मध्ये आहे असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी या वेळी केले.

ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था गेले पाच वर्ष वृक्षारोपण संवर्धन मोहीम राबवत आहे आज पर्यंत फाउंडेशन च्या वतीने बहुतांश झाडे लावण्यात व जगण्यात आली .ग्रीन फाउंडेशन चे कार्य पारदर्शक आहे महिन्याचे चार आठवडे  झाडांना पाणी घालणारी भारतातील पहीली संस्था आसेल या या कार्या मुळे ग्रीन फाउंडेशन यांना

सामाजिक युवा नेते अमेय अनिल अग्रहारकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिक्षा कोळपे यांच्या वतीने तीर्थक्षेत्र रामदरा केसकर वस्ती येथील झाडांना ठिबक सिंचन चा संपूर्ण खर्च ग्रीन फाउंडेशन ला देण्यात येणार आहे. उन्हाळ्याचा वाढता कडका पहाता प्रतिक्षा  कोळपे यांनी ग्रीन फाउंडेशन सामाजिक संस्थेला वाढदिवसानिमित्त मदत करण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.