सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्री दाभाडे साळुंके यांना राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार जाहीर

0

जळगाव प्रतिनिधी: खान्देश जनसेवा फाऊंडेशन व खान्देश न्युज नेटवर्क यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन मागविण्यात आले होते.सावित्रीबाई फुले पुण्यतिथी रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

निर्भीड,वास्तव लिखाण करणाऱ्या प्रा जयश्री दाभाडे ह्या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.समाजातील विविध प्रश्न त्यांनी हाताळले आहेत.आज पर्यंत 4000 कुटुंबांचे समुपदेशन त्यांनी केले आहे.गोर गरीब,आदिवासी, दलित महिला यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी  अनेक वेळा रस्त्यावर उतरून विविध आंदोलने करून अन्यायाला वाचा फोडली आहे.विशेष म्हणजे एका वरिष्ठ महाविद्यालयात प्रा म्हणून कार्यरत असताना मस्त चार आकडी पगार असताना त्यांना काही गरज नसताना त्या नेहमीच अन्याय ग्रस्त लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतात.सर्व कार्य करत असताना त्यांच्या दोन कन्या ना देखील उच्च विभूषित करून नोकरी आणि इतर ऍक्टिव्हिटी त अग्रेसर ठेवत मोठं मोठया आंतरराष्ट्रीय कंपनीत त्यांच्या कन्या नोकरी करत आहेत. त्यांना 11 भाषा अवगत असूनमहाविद्यालयीन कार्य करून  नृत्य,पेंटिंग,रांगोळी, म्युरल आर्ट,कविता लिखाण ,संपादकीय लिखाण, चारोळी लिखाण, इ छंद जोपासले आहेत.

खान्देश कन्या राज्यस्तरीय नारी गौरव पुरस्कारासाठी भुसावळ येथील रहिवासी व सध्या कतार या देशात व्यास्तव्यास असलेल्या प्रा.डॉ.अरुणा धाडे,बामणोद येथील रहिवासी व मोहमांडली या आदिवासी भागात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका श्रीमती पल्लवी पुरुषोत्तम भारंबे तसेच रावेर पंचायत समितीच्या सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ.योगिता रामदास वानखेडे यांना जाहीर झाला असून राज्यस्तरीय नारीरत्न सन्मान पुरस्कार स्मार्ट ग्राम चिनावलच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ.भावना योगेश बोरोले,भादली केंद्राच्या केंद्रप्रमुख, शिक्षिका श्रीमती वैशाली रमेश बाविस्कर तसेच नशिराबाद येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या व मिशन रेड अलर्ट या अभियानाच्या प्रमुख सौ.दिपा प्रमोद येवले यांना जाहीर झाला आहे.

त्याचप्रमाणे राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार साठी आदर्श शिक्षिका ज्योती राणे जळगाव, उपक्रमशील शिक्षिका अश्विनी योगेश कोळी फैजपूर, पत्रकार व संपादिका प्रा.जयश्री दाभाडे साळुंके अमळनेर, सामाजिक कार्यकर्त्या सौ.मनिषा बेंडाळे ऐरोली, जागतिक विक्रमाची कामगिरी करणाऱ्या अॅड.जया उभे पुणे, महिला पोलीस पाटील सौ.रहिसा सलीम तडवी जानोरी, सामाजिक कार्यकर्त्या रुबीना अन्वर पटेल नांदुरा बुलढाणा, सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगिता प्रमोद पाटील पालघर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हि परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर व प्रशासनाच्या परवानगीने लवकरच जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात सर्व पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.