सलग तिसऱ्या दिवशी सोनं महागलं ; जाणून घ्या आजचे ताजे दर

0

नवी दिल्ली : मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशी सोन्याचा दरांमध्ये तेजी आल्याचं समोर आलं आहे. आज दिवसाच्या सुरुवातीला 22 कॅरेट सोन्याचा भाव 160 रुपयांनी वाढून 43,680 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर सोमवारी 43,520 रुपये होता. एमसीएक्सवरील सोन्याचे वायदा भाव प्रति 10 ग्रॅम 44,360 होते. त्याचबरोबर चांदीचा वायदा दर दहा ग्रॅम 0.5 टक्क्यांनी वाढून 66,202 वर गेला आहे.

 

सोन्याची किंमत 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याचा विक्रम 56,200 च्या विक्रम पातळीवर होता. आतापर्यंत सोन्याच्या किंमती या पातळीवरून 12000 रुपयांनी घसरल्या आहेत.

दिल्लीमध्ये सोन्याचे ताजे भाव

दिल्लीतील 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीविषयी बोलायचं झालं तर प्रति 10 ग्रॅम 44,150 रुपये झाली आहे. तर दिवशी हे दर प्रति 10 ग्रॅम, 43,860 रुपये होते. 9 मार्चला मुंबईतील सोन्याचा दर 10 ग्रॅम 43,680 रुपयांवर आहे.

कोलकाता आणि चेन्नईमध्ये सोन्याच्या किंमती

कोलकातामध्ये मंगळवारी 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,120 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 46,760 रुपये आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 42,210 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 46,050 रुपये आहे.

सोने आठ महिन्यांत 12,086 रुपयांनी स्वस्त

यावेळी, ऑगस्ट 2020 च्या अखेरच्या उच्चांकाच्या तुलनेत सोने सुमारे 12,086 रुपयांनी स्वस्त झाले. ऑगस्टमध्ये ते 56200 च्या पातळीवर पोहोचले होते. गेल्या आठवड्यात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 522 रुपयांनी घसरली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, कॉमेक्सच्या कमकुवततेमुळे 24 कॅरेट सोन्याच्या किमती दिल्लीत 122 रुपयांनी घसरल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.