सर, तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग

0

मोदींच्या ट्‌विटला अभिनेत्री रेणुका शहाणेचा खोचकपणे रिप्लाय

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध देशभर आंदोलने सुरु आहेत. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन लोकांना शांततेंचं आवाहन केलं. त्यांच्या याच ट्‌विटला आता अभिनेत्री रेणुका शहाणे हिने खोचकपणे रिप्लाय केला आहे. भाजपाचे आयटी सेलच खरी तुकडे तुकडे गॅंग आहे, अशी बोचरी टीका अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केली आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरामध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेणुका यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सोमवारी देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. देशातील या अशांततेसाठी भाजपाचे आयटी सेल जबाबदार असल्याचा टीका रेणुका शहाणे यांनी ट्‌विटवरुन केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.