सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोनाची लस मिळावी

0

पारोळा (प्रतिनिधी) : जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना बाबत लस उपलब्ध झाली असली तरी ती अद्याप समाजातील सर्व सामान्य घटकांना मिळालेली नाही. ही लस लवकरात लवकर गोर गरिबांनाही मिळावी, अशी मागणी पारोळा राष्ट्रवादी महिला कॉग्रेस व पारोळा युवक काँग्रेसने प्रशासनामार्फत पंतप्रधानां कडे केली.

याबाबत पारोळा  तहसिलदार अनिल गंवादे यांना निवेदन देण्यात आले त्यात असे की, लोक सभेतील गटनेत्या खा सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचनेनुसार देशभरातून अशी निवेदने पंतप्रधानांना पाठविण्यात येत आहेत.

संपूर्ण जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे.अशा कठीण परिस्थितीत आता पुन्हा कोरोना रोगाच्या संकटाने महाराष्ट्रात  सुरूवात झालेली दिसत आहे. या संकटाला सर्वस्वी नागरिक जबाबदार आहे हे प्रथम दर्शनी दिसून येते. मात्र तरीही नागरिकांना वाऱ्यावर सोडुन केंद्र सरकारला चालणार नाही.

जळगाव प्रभारी जिल्हा महिलाअध्यक्षा सौ कल्पनाताई यांच्या व प्रदेशउपाध्यक्ष सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज पारोळा येथे तहसिलदार यांना  निवेदन देण्यात आले  त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला एरंडोल विधानसभा क्षेत्र प्रमुख सुवर्णा पाटील व सुनंदा शेंडे तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष योगेश रोकडे, अन्नपुर्ना पाटील, आशा बाई महाजन, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.