श्री संत सावता माळी युवक संघ शाखा लासुर यांच्यातर्फे आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-आयुष मंत्रालयाने सुचविलेले कोरोना प्रतिबंधक ( रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ) होमिओपॅथीक औषध आर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्यांचे वाटप श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन गुलदगड व प्रदेश अध्यक्ष जितेंद्र सुरेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अडव्होकेट कुंदन साळुंखे यांच्या अनमोल सहकार्याने लासुर येथील बाजार चौकातील व्यावसायिक त्यात किराणा, कृषी केंद्र, जनरल स्टोअर्स, टेलरिंग व्यवसाय धारक, गॅरेज, भाजीपाला व्यवसाय धारक, आटाचक्की व स्टेट बँक लासुर येथील कर्मचारी व इतर व्यवसायधारक यांचा सर्व सामान्य नागरिकांशी जवळ चा संपर्क येत असतो त्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्तीत वाढ व्हावी यासाठी श्री संत सावता माळी युवक महाराष्ट्र राज्य शाखा लासुर यांनी Arsenicum album 30 cm या गोळ्यांचे वाटप बाजारचौक लासुर येथील व्यवसाय धारकांना वाटप करण्यात आल्या.

सदर गोळ्यांचे वाटप करत असताना सामाजिक बांधिलकी जपून सोशल डिस्टटिंग पाळून ही मदत नसून एक आपले कर्तव्य आहे अशी भावना युवक संघाची आहे असे प्रतिपादन युवक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी यांनी दिले.
तसेच याप्रसंगी लासुर शाखा अध्यक्ष नरेंद्र महाजन यांनी कोव्हीड 19 या संदर्भात नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढुन या आजारापासून ते बचावले जावे तसेच कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने अधिकृत केलेले होमिओपॅथीक औषध आर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्या सेवन करून सुरक्षित राहावे असे मत व्यक्त केले.
सदर गोळ्याच्या वाटपासाठी श्री संत सावता माळी युवक संघाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी, लासुर शाखा अध्यक्ष नरेंद्र महाजन, मार्गदर्शक राजेंद्र महाजन, सचिव भुमेश्वर मगरे, संपर्क प्रमुख प्रेमराज शेलकर,दैनिक लोकशाहीचे पत्रकार परेश पालीवाल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश्वर महाजन,विनोद महाजन सर, समाधान माळी सर,राहुल मगरे, हर्षल माळी आदी यांनी उपस्थित राहून गोळ्यांचे वाटप करून गोळ्या घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.