श्री.गो.से. हायस्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

0

पाचोरा  (प्रतिनिधी) : पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये दि. १९ फेब्रुवारी २०२१ शुक्रवार रोजी  प्रौढप्रताप पुरंदर राजाधिराज योगीराज, क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती प्रतिमा पुजन व  माल्यार्पण करुन साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी. एम. वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, एन. आर. पाटील कार्यालय प्रमुख अजय सिनकर  सर्व शिक्षक – शिक्षकेतर  कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.