शौचालयाच्‍या दुरूस्‍तीसाठी मुख्याधिकार्‍यांना निवेदन

0

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील प्रभाग क्रमांक १८ मधील गंगाराम प्लॉट, पंचशील नगर,कोलते गल्ली गौतम नगर आदी भागांमधील शौचालयाची दुर्दशा झाली असून त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका मीनाक्षी धांडे व सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्‍हटले आहे कि, या भागातील शौचालयांमध्ये वॉश बेसिंग, टाइल्स,दरवाजे,पाणी कुंड,दिवे, रंग,नळ कनेक्शन आदी दुरुस्‍ती, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी पश्‍चिमात्‍य शौचालय तात्काळ करण्यात यावे,प्रभागातील संतोषी माता मंदिर जवळ ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात यावी, प्रभागातील पथदिवे बऱ्याच दिवसांपासून बंद असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.तरी सर्व समस्या तात्काळ सोडवण्यात याव्‍या अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.