शेतकऱ्यांना व छोट्या व्यावसायिकांना त्वरीत मदत करा

0

चिखली (प्रतिनिधी) : मे रोजी रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी चिखली तहसीलदार

यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना शेतकरी व छोटे व्यावसायिक यांना प्रशासनाने तात्काळ मदत करावी म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली आहे,

निवेदनात त्यांनी कोरोना महामारी , आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचे प्रशांत पाटील यांनी सांगितले,

त्यात त्यांनी गेल्या एक वर्षापासून राज्यातील नागरिक कोरोना व नैसर्गिक आपत्ती तीन विचारांच्या राज्यसरकार मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत तसेच छोटे व्यवसायिक सुद्धा प्रचंड अडचणीत आले आहेत तरी रयत क्रांती संघटनेतर्फे राज्यातील नागरिक व शेतकरी यांच्यासाठी खालील प्रमाणे मागण्या करत आहे,

१) आत्तापर्यंत झालेल्या कर्ज माफीमध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफी करण्यात यावी व तात्काळ पिक कर्ज देण्यात यावे.

२) छोटे उद्योजक व व्यावसायिक यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत करण्यात यावी.

३) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा.

४) कोरोना रुग्णांना सरसकट महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा व पात्र रुग्णांचे पैसे ज्या हॉस्पिटलने घेतले असतील ते पैसे रुग्णांना परत मिळवण्याचे आदेश व्हावेत.

५) नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज माफी मिळावी.

६)विध्यार्थ्यांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करण्यात यावी.

७)कोरोना काळातील संपूर्ण विजबिल माफ करण्यात यावे.

कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्ती असून या काळामध्ये शेतकरी व व्यवसायिक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शासन व अत्यावश्यक सेवेमध्ये राज्याला मदत केली आहे परंतु त्यांच्याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे शेतकरी,छोटे व्यवसायिक अडचणीत आले असून अशा काळामध्ये शासन व प्रशासनाने संबंधित व्यक्तींना मदत करणे गरजेचे आहे,त्यामुळे वरील मागण्यांचा संवेदनशीलपणे सहानुभूती पूर्वक विचार करून त्वरित निर्णय व्हावेत सदर मागण्या मान्य न झाल्यास लॉकडाऊन उठल्यानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन राज्यभर छेडण्यात येईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी दिला आहे सदर निवेदनावर प्रशांत पाटील,सचिन पडघान,दिनेश माळी, मंगेश सुरडकर,पिंटू वाहेकर,सचिन काकडे,रुद्र पाटील,यशपाल लहाने,रवी इंगळे आदींच्या सह्या असलेले निवेदन चिखली तहसीलदार यांना सादर करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.