ना.बच्चू कडूंचे अमरावती येथे थाळिनाद आंंदोलन

0

अमरावती (प्रतिनिधी) : एकीकडे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात लॉकडाऊनमूळे शेतकरीं पूरता डबघाईला आलेला असतानाच आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आल आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या प्रहारच्या कार्यकर्त्यां समवेत अमरावती येथील राजकमल चौकात थाली बजाव आंदोलन करुन केंद्र सरकार चे लक्ष वेधले.

केंद्राने रासायनिक खताची दरवाढ मागे घेतली आहे.तर भारतात ४२ लाख टन तुरी ची आवश्यकता असुन ४५ लाख टन तुर उपलब्ध आहे. आवश्यकतेपेक्षा २ लाख टन तुर उपलब्ध असताना. केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? हा सवाल सुद्धा त्यांनी व्यक्त केला. तसेच तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात थांबवण्याची मागणी बच्चू कडू यांनी सरकारकडे केलेली आहे.

केंद्राने रासायनिक खताची दरवाढ मागे घेतली आहे.भारतात ४२ लाख टनाची आवश्यकता असुन ४५ लाख टन तुर उपलब्ध आहे. आवश्यकतेपेक्षा २ लाख टन तुर उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? तसेच तुर, मुग, उडीद आयात पुर्णपणे खुली करुन धान्याचे भाव पाडण्यात येणार आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. प्रहार कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या . या आंदोलनात नामदार बच्चू कडू यांच्यासह जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसु, बंटी रामटेके, शेख अकबर, शाम इंगळे, अभिजीत गोंडाणे, गौरव ठाकरे, पंकज सुरडकर ,निलेश ठाकूर, रवी ठाकूर,  गोलु ठाकूर, निलेश पानसे, प्रवीण शिंदे आदी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.