शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रास शासनाचा दोन लाखांचा कायाकल्प पुरस्कार घोषित

0

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : दोन वेळा आनंदीबाई जोशी पुरस्कार, आय एस.ओ.मानांकन व आता शासनाचा २ लाखांचा कायाकल्प पुरस्कार घोषीत झाल्याने शेंदुर्णीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शासनाने ठरवुन दिलेल्या सर्व निकषांवर खरं उतरत जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या व ८४  गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावत दोन लाख रुपयांचा कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे.

येथील भुमीपुत्र व वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने मेहनत करत हा पुरस्कार मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असुन प्राथमिक आरोग्य केंद्रात सुख सुविधा रुग्णांना सोयीसुविधा, परिसरात वनराई, वृक्ष लागवड त्याचे संवर्धनासाठी प्रयत्न केले यामुळे परिसरात सर्वत्र हिरवळ आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वतःच्या मालकीची रुग्णवाहिका आहे.लोकप्रतिनिधी व लोक सहभागातुन केंद्राचे सुशोभीकरण झाले आहे. हा पुरस्कार मिळाल्याने डॉ. राहुल निकम व त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हा पुरस्कार म्हणजे सर्वांच्या सहभागातुन, सहकार्याने मिळालेले यश असल्याचे प्रतिपादन शेंदुर्णीचे भुमीपुत्र व वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.