शेंदुर्णी तीन दिवस जनता कर्फ्यू ; काय सुरु काय बंद राहणार?

0

शेंदुर्णी ता.जामनेर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथिल नगरपंचायत कार्यालयात सर्वपक्षिय राजकिय नेते, व्यापारी, प्रशासन, पत्रकार यांच्या संयुक्त बैठकि मध्ये बुधवार ते शुक्रवार असा तीन दिवसीय जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शासकिय अस्थापना, वैद्यकिय सेवा, औषधालय, दुध डेअरी (सकाळी ७ ते ९वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ते ७ वाजेपर्यंत ), पतसंस्था, बँक इत्यादी वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने. किरकोळ विक्रेते, भाजी विक्रेते, खाजगी वाहतुक इत्यादी बंद राहील. तसेच, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नगरपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या बैठकी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, भाजपाचे ज्येष्ठ नेते उत्तम थोरात पंडित दीनदयाल पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय अग्रवाल मनसे जिल्हा उपाध्यक्ष विजयानंद कुलकर्णी, योगेश लोनिया, मयूर झवर , गिरिष कुलकर्णी, धीरज जैन, नगर सेवक , पत्रकार आदी प्रमुख प्रतिनिधी उपस्थीत होते .

यावेळी उत्तम थोरात यांनी लग्न समारभामध्ये होत असलेली शेकडोंची गर्दी आणि मिरवणुका यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच प्रशासनाने कडक भुमिका घेण्याची इच्छा व्यक्त केली . व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष तजय अग्रवाल यांनी व्यापारी गावाच्या निर्णया सोबत असल्याचे नमुद केले . तर डॉ विजयानंद कुलकर्णी यांनी जनता कर्फ्युला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले .

तसेच दिग्विजय सुर्यवंशी यांनी ‘ नो मास्क – नो माल ‘ संकल्पना मांडली आणि लॉक डाऊन नंतर देखील कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता असल्याचे नमुद केले . त्यानंतर भाजपा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी सर्वानुमते तीन दिवसीय जनता कर्फ्युचे मत व्यक्त केले असता सर्वांनी दुजोरा दिला तसेच नगर पचायत तर्फे करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. तसेच नागरीकांनी नियमांचे पालन करीत संपर्कातील व्यक्तींनी घाबरून न जाता टेस्ट करून उपचार घेण्याचे आवाहन केले .

त्यानंतर प्रशासनातर्फे पीआय राहुल खताळ यांनी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी नागरीकांनी देखील जबाबदारीचे भान ठेवून कोरोना पासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी आवश्यक असेल तरच घराबाहेर निघण्याचे आवाहन केले . तसेच पोलीस प्रशासनातर्फे कडक कार्यवाहीसाठी अतिरीक्त कुमक उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले .

Leave A Reply

Your email address will not be published.