शेंदुर्णीत नगरपंचायतीच्या वतीने कोविड रुग्णांची शोध मोहीम व मोफत चाचणी

0

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत नगरपंचायत कोविड रुग्णांची शोध मोहिम हाती घेण्यात आली असुन शहरात विविध ठिकाणी नागरिकांची मोफत चाचणी करण्यात येत आहे.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या वाढत चाललेल्या करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी शासनाच्या मोहिमेत शेंदुर्णी नगरपंचायतीचे हे कार्य उल्लेखनीय आहे. शहरातील विविध चौकात, मोहल्ल्यात कोविड रुग्णांची शोध मोहीम हाती घेण्यात आली असुन नागरिकांची मोफत चाचणी सुद्धा घेण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ४५० नागरिकांची चाचणी करण्यात आली असुन यात १७ रुग्ण बाधित आढळले आहे. नगरपंचयतीस या उपक्रमात खाजगी लँब चालक यांचे सहकार्य लाभत आहे.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे….मुख्याधिकारी
करोनाचा प्रभाव कमी होण्यासाठी नागरिकांनी शासनाने प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा,सँनिटायझर चा वापर करावा, मास्क ,सोशल डिस्टिंशन पाळावे, आरोग्याची काळजी घ्यावी, डाँक्टरांचा सल्ला घ्यावा,चाचणी करुन घ्यावी, करोनाची लस घ्यावी आपले व आपल्या गावाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.