शेंदुर्णीत घरफोडी, चांदीच्या शिक्क्यांसह आहेराचे कपड्यांची चोरी

0

शेंदुर्णी ता.जामनेर (वार्ताहर) : येथील  उज्वला काशिद यांच्या बंद घरात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाज्याचे कुलुप तोडुन चांदीचे शिक्के व आहेराच्या साड्या,कपडे यावर डल्ला मारला असुन सकाळी ६-३० ते ७-००च्या दरम्यान ही घटना घडली आहे.

यात १०,००० रुपयांच्या किंमतीच्या आहेरा साठी आणलेल्या साड्या,पँण्ट पीस ,शर्ट पीस तसेच १० -१२राणी झापाचे चांदीचे शिक्के १७०००/रुपये किंमतीचा ऐवज लंपास झाला आहे. या प्रकरणी विलास वसंतराव देशमुख यांनी शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे  फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पहुरचे सपोनि राकेशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी दुरक्षेत्र चे पोउपनि किरण बर्गे ,हे काँ.किरण शिंपी व पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.