शेंदुर्णीचा बुधवारी भरणारा आठवडे बाजार बंद

0

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : सध्या वाढत्या करोनाच्या पार्दुभावाने जिल्ह्यात कडक अंमलबजावणी सुरू झाली असुन  यात गावात भरणारे आठवडे बाजारही जिल्हाधिकारी जळगांव यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आले असुन आता दर बुधवारी भरणारा शेंदुर्णीचा आठवडे बाजार आता बंद राहणार आहे.

शेंदुर्णी गाव जामनेर तालुक्यातील मोठे गाव असुन बाजारपेठ सुद्धा मोठी आहे. पंचक्रोशीतील असंख्य गावे यामुळे शेंदुर्णीशी जोडली गेले आहे. बुधवारी भरणारा आठवडे बाजारात मोठी गर्दी होत असते.

आता पुन्हा नव्याने जिल्ह्यात करोनाचा प्रभाव वाढत आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणुनच आठवडे बाजार बंद करण्यात आले आहे. यामुळे दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार पुढील आदेश येईस्तोवर बंद राहणार आहे.

तरी बुधवारी आठवडे बाजारात येणारे व्यापारी, शेतकरी, नागरिक यांनी बाजारात येऊ नये,नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टिंशन चा वापर करावा असे आवाहन शेंदुर्णी नगरीच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.