शिवसेनेचे डॉ.हषॅल माने विधानसभेसाठी इच्छुक

0

पारोळा (प्रतिनिधी) 

एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघासाठी आपण इच्छुक आहोत व तसे प्रयत्न ही सुरू केले आहेत, अशी माहिती येथील मंगरूळ-शिरसमणी गटाचे जि.प.सदस्य डॉ.हषॅल माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पारोळा पंचायत समितीचे पाच सदस्याचा आपणास पाठिंबा आहे व त्यांनी समथॅन दिल्याचेही सांगितले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली अाहे. डॉ, माने यांनी सांगितले की आपण जनतेच्या सेवेसाठी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवु, आपणास पारोळा पंचायत समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व शिवसेनेच्या पाच सदस्यांनी लेखी समथॅन दिल्याचेही सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, माजी सभापती छाया पाटील, सदस्य अशोक पाटील, शिवसेनेचे सदस्य प्रमोद जाधव, रेखाबाई भिल, चोरवडचे सुभाष पाटील, आदि या वेळी उपस्थित होते. एकंदरीत सधस्थिती पाहाता एरंडोल-पारोळा मतदार संघातून अनेक जण इच्छुक असल्याने या मतदार संघाकडे सवॅ वरिष्ठांचे ही विषेश लक्ष आहे. कोणाला कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळते व कोण कोण अपक्ष उमेदवार रिंगणात उतरतील हे येणारा काळच ठरवील, तो पयॅंत सवाॅचेच वेट अँड वाच चालू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.