बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी

0

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल-धुळे यवतमाळ राज्य परिवहन महामंडळ राज्य परिवहन महामंडळाची बस व पातरखेडे येथील ग्रा.प. सरपंच सरलाबाई भगवान पाटील व त्यांचे पती भगवान पाटील यांची दुचाकी या दोन्ही वाहनांमध्ये धारागीर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रविवारी सकाळी ९.३० वा. सुमारास अपघात झाला. त्यात सरलाबाई पाटील व भगवान पाटील हे दोन्ही गंभीर जखमी झाले. त्यांना बेशुद्धावस्थेत जळगावला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत असलेले पातरखेडे येथून भगवान पाटील व त्यांच्या पत्नी सरलाबाई पाटील हे दांपत्य पातरखेडे येथून निघून एम.एच १९ बीए ३२५० क्रमांकाच्या दुचाकीने एरंडोल कडे येत होते.   धारागीर गावाजवळ मागून येणारी एम. एच ४०  ए क्यु ६२७५ क्रमांकाची धुळे यवतमाळ बस व दुचाकी यांच्यात अपघात झाला. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पडलेले खड्डे पडलेले खड्डे चुकविताना घडली अशी माहिती पुढे येत आहे. या दोन्ही वाहनांमध्ये अपघात होऊन पाटील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. याप्रकरणी एरंडोल पो.स्टे. ला रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

रविवारी सकाळी धारागीर जवळ यवतमाळ बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या भगवान किरण पाटील ( वय ६७ वर्षे ) यांचे जळगाव येथे रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री निधन झाले. दीपक भगवान पाटील व महिंद्रा भगवान पाटील दोघे पोलीस कर्मचाऱ्यांची ते वडील होत त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १२ वा. पातरखेडे येथून निघणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.