शिवपूर कन्हाळ्यात ७० लिटर गावठी दारू सह एक ताब्यात

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शिवपूर कन्हाळ्यात तालुका  पोलिसांनी सोमवार ९ मार्च रोजी रात्री केलेेल्या कोम्बिंग दरम्यान  गावठी दारू अड्डयावर धाड टाकून एकास ताब्यात घेतले असून त्याचे विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज सोमवार  रोजी भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा गावी नाल्याच्या बाजूला संशयित आरोपी पिरू गंगा गवळी हा जळती भट्टीवर गावठी हातभट्टीची दारू तयार करताना रंगेहात सापडला . त्याचे जवळ  बाजूला गरम व नवसागर मिश्रीत दारू पाडण्याचे कच्चे रसायन  ०६ ड्रम व ७० लिटर तयार दारू अंदाजे  किंमत ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल सह मिळून आला म्हणून प्रॉव्हिसन कायदा अन्वये तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून  आरोपीस अटक करण्यात आली आहे.

ही  कारवाई स्वतः उप विभागीय पोलिस अधिकारी शगजानन राठोड,  पोलीस निरीक्षक  रामकृष्ण कुंभार,  पो .हे .कॉ विठ्ठल फुसे , रियाज काझी , प्रवीण पाटील,  पो कॉ शिवाजी खंडारे, जगदीश भोई ,यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.