शिवजन्मोत्सव निमित्त अश्वमेध स्कू चे भव्य मिरवणूक

0
पिलखोड ता चाळीसगाव
१९ फेब्रुवारी ही भारतीयांसाठी केवळ एक तारीख नसून एक उत्सव आहे…आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा सोहळा.
सालाबादप्रमाणे यंदाही अश्वमेध पब्लिक स्कूल आणि अनन्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी प्र.दे. , देवळी आणि आडगाव या गावांत तसेच शाळेत भव्य बाईक रॅली काढून आणि पोवाडे , पाळणा गीत , नृत्य , लाठी – काठी प्रदर्शन करत विद्यार्थी , पालक , ग्रामस्थ , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच शेकडो युवकांनी पुढाकार घेत अनन्या फाउंडेशन आणि अश्वमेध पब्लिक स्कूलच्या संस्थापिका अध्यक्षा सौ अश्विनी सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजा शिव छत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा संपन्न केला.
‌याप्रसंगी प्रत्येक गावात मान्यवरांनी सौ अश्विनी सुभाष पाटील यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. याप्रसंगी तरुण पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सौ अश्विनी सुभाष पाटील म्हणाल्या की, छत्रपतींचा आदर्श समोर ठेऊन प्रत्येकाने आपापल्या पातळीवर शिव विचार कसे अंगीकार करून समाजाचा उत्कर्ष होईन यासाठी प्रयत्न करायला हवे . फक्त १९ फेब्रुवारीला उत्सव साजरा करून थांबायचं नाहीये तर दैनंदिन जीवनात शिवाजी महाराजांच्या विचारांचे आपण सर्वांनी अनुकरण करायचे आहे.
‌याप्रसंगी तरुणाईने एकच जल्लोष केला होता आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात शिवगर्जना आणि जयघोष करीत संपूर्ण परिसर शिवमय होऊन भगव्या रंगात न्हावून निघाला!

Leave A Reply

Your email address will not be published.