शिक्षण विभागाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपसंचालकांची भेट

0

भुसावळ (प्रतिनिधी)  –  शिक्षण विभागाच्या माध्यमातून नाशिक येथील उपसंचालक कार्यालयात येणाऱ्ाय विविध कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी शिक्षक संघटनेच्या वतीने नाशिक येथील शिक्षण  उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेतली व चर्चा करण्यात आली. यावर सकारत्मकता दर्शवत येणाऱ्े काम तात्काळ मार्गी लावले जात असल्याची माहीती नितीन उपासनी यांनी दिली.

जळगाव जिल्हा शिक्षण विभागातून शिक्षकांचे शालार्थ आयडी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांचे अॅप्रुव्हल, वैद्यकीय बिले, संच मान्यते मधील त्रुटी, विनाअनुदानीत तुकडी मान्यता, ट्प्पा अनुदान यासह इतर कामे शिक्षण उपसंचालक कार्यालयात येत असतात. येथे नाशिक विभागाचा कामाची व्याप्ती मोठी आहे. जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचे व संस्थाच्या कामांना प्राधान्य देवून त्रुटी पुर्तता केल्यानंतर तात्काळ मार्गी लावावी यासाठी ईब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर. धनगर, भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघटनचे तालुकाध्यक्ष जे. पी. सपकाळे यांनी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी उपसंचालक नितीन उपासनी यांनी सांगीतले की, कोणतेही काम तात्काळ होईल यासाठी प्रयत्न असतो. तसेच शिक्षक संघटना व प्रशासन यांच्या माध्यमातून पारदर्शक काम करण्यावर भर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.