शिक्षक हा एक शिल्पकार – आर.बी.देशमुख

0

चोपडा दि . 31
चोपडा एज्यूकेशन सोसायटीच्या अध्यापक विद्यालयामार्फत आंतरवासीतेचे आयोजन नागलवाडी येथील जि.प.केंद्र प्राथमिक शाळा आणि चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आले होते.शिक्षक हा एक शिल्पकार असतो जो विद्यार्थ्यांना घडवताना व्यक्तिमत्वातल्या अनावश्यक बाबी काढून एका सुंदर मूर्तीमध्ये त्याचे रूपांतर करतो.असे नागलवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.बी.देशमुख यांनी सांगितले .बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलतानां त्यांनी छात्र शिक्षकांच्या शिस्तीचे आणि आयोजनाचे विशेष कौतुक केले.प्रथम व द्वितीय वर्ष छात्र शिक्षकांनी सराव पाठांसोबतच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा देखील घेतल्या.प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.माध्यमिक विद्यालयाचे मुख्याधापक आर. बी. देशमुख आणि जि.प.शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कंखरे यांच्या हस्ते संबंधित शाळेत बक्षीस वितरण करण्यात आले.विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच छात्र शिक्षकांचे माजी प्राचार्य.किरण पाटील आणि प्राचार्या योगिता बोरसे यांनी अभिनंदन केले.आंतरवासीतेच्या एकूणच आयोजनात दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद आणि अध्यापक विद्यालयाचे प्रा.आर.एस.नेवे,प्रा.एम.एन.मराठे,प्रा.एस.एस.देशमुख,श्रीमती.एस.व्ही.गुजराथी, .एम.एम. पाटील या अध्यपकाचार्यांचे सहकार्य छात्र शिक्षकांना लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.