शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनच मंजुर करण्याची मागणी

0

कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) : राज्यात २००५ नंतरच्या नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक व सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना नविन पेंन्शन योजना (एनपीएस) सुरू करण्यात आली आहे. तरी ती नियमबाह्य असून जुनी पेन्शनच लागू करण्याची मागणी होत आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात ६६ शिक्षक दगावले. त्यात नविन पेन्शन योजनेचे शिक्षक आहे. परंतु नविन पेन्शन योजना लाभदायी नसल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा भयंकर प्रसंग आला आहे. शासनाने नाविन पेन्शन योजनेची प्रत्येक कर्मचाऱ्यांची वैयक्तीक माहिती घेऊन एन पी एस साठी गोळा करीत आहे. तरी ती त्वरीत रद्द करून २००५ नंतरच्या सर्व कर्मचारी वर्गास जुनी पेन्शन योजना कायम ठेवावी अशी मागणी एरंडोल तालुका टि डि एफ अध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी पत्रकातून केली आहे.

शासनाने शिक्षक व कर्मचारी वर्गामधे दुप्पटी धोरण अवलंबून दिशाभूल करण्याचे काम केले आहे. शाळा संहिता कोड कायदयानुसार सन १९८२ ची जुनी पेन्शन योजना सुरू केली होती , तिच योजना जैसे थे ठेवावी. या बाबतीत शासनाने कोणत्याही शिक्षक संघटनांचे किंवा कर्मचारी संघटनांचे मत न मागता नविन पेन्शन योजना सुरू करून शिक्षक व कर्मचारी वर्गाला संभ्रमात टाकले आहे. शासनाने शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार सातत्यपूर्ण सर्व कष मुल्यमापन धोरणाप्रमाणे इ १ ली ते ८वी पर्यन्तच्या अध्यापन करण्याऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन अध्यापन पद्धतीत बदल केला आहे. यात शासनाचा हेतू एकच विदयार्थांच्या सर्वांगीण विकास व्हावा. आता आणखी शैक्षणिक धोरणात बदल होणार असल्याचे संकेत आहे.

शासनाने शैक्षणिक धोरणात बदल करावा . परंतु शिक्षकांना व कर्मचारी बांधवाना जुनी पेन्शन योजनेपासून वंचीत ठेऊ नये . शासनाने यापुर्वी समान शिक्षण समान वेतन या धोरणाचा अवलंब करून सन २००५ नंतर च्या सेवेत समाविष्ठ असलेल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेशंनच मंजूर करावी. या बाबतीत अनेक शिक्षक संघटना व कर्मचारी संघटना न्यायालयात गेल्या़ परंतू या बाबतीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही किंवा झाला असेन परंतू या धोरणात जैसे थे बदल करण्याचे अधिकार राज्य शासन व केंद्र शासनास आहे. तरी शासनाने सकारात्मक विचार करून दुप्पटी धोरणाचा बदल करून अर्थात २००५ च्या अगोदरच्या शिक्षक कर्मचारी वर्गास जुनी पेन्शन व २००५ नंतरच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना नविन पेंन्शन योजना असे न करता सरसकट जुनी पेन्शनचा लाभ मिळावा अशी मागणी शिक्षक संघटनेचे तथा मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.