आ.सुधीर तांबे यांच्या प्रयत्नाने 14 वर्षाचा विनावेतनाचा वनवास संपुष्टात

0

भातखंडे (प्रतिनिधी):– विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना (Non Aided School Teachers) काहीसा दिलासा देणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. विनाअनुदानित माध्यमिक शाळा, यांना मिळणारं अनुदान 20 टक्क्यांनी वाढविण्यात आल्याने आता 40%अनुदाचा लाभ शिक्षकांना मिळाला आहे.

ज्या शाळांना 0 टक्के अनुदान होतं, त्यांना 20 टक्के, तर ज्या शाळांना 20 टक्के अनुदान दिलं जात होतं, त्यांचं अनुदान 20 टक्क्यांनी वाढवून 40 टक्क्यांवर नेण्यात आले आहे. अशी माहिती नाशिक विभागाचे प्रा.अनिल परदेशी (समन्वयक) यांनी दिली.

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या अंशतः मान्य झाल्याचं दिसत आहे.अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्रुटीतील शाळा,अघोषित शाळा निधीसह घोषित करणे,मंत्रालयीन तपासण्या पूर्ण करने,प्रचलित धोरण सुरू करणे अशी अनेक विषयाचे निर्णय करून घेण्यात येतील.विनाअनुदानित शाळा, महाविद्यालय यांना 20 टक्के अनुदान देण्यात आले आहे. ज्या शाळांना आधी 20 टक्के अनुदान दिले गेले होते, त्यांना 40 टक्के अनुदान देण्यात आले आहे.

राज्यांतील विनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान 2020च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, हा निधी वितरित करण्यात आलेला नव्हता. हा निधी मिळावा, यासाठी गेल्या 52 दिवसांपासून राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरू होते. या आंदोलनात सक्रिय सहभाग आ.सुधीर तांबे यांनी घेतला होता.

विनाअनुदानित शाळांना 145 कोटी रुपयांचा लाभ यामुळे  मिळाला आहे. या संदर्भातील  प्रक्रिया पूर्ण होऊन राज्यातील शिक्षकांना 20 टक्के व 40 टक्के वेतनाचा लाभ मिळलाआहे.

मोठ्या प्रमाणात या अनुदानाचा या निर्णयाचा फायदा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या,व शाखांवरील 33245शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे,असे प्रा.अनिल परदेशी म्हणाले.

अनुदान मिळावे या मागणीसाठी 350 पेक्षा अधिक आंदोलने झाली.यामध्ये आमरण उपोषण, रास्ता रोको,मंत्रालयाला घेराव, बारावी परीक्षा कामकाजावर बहिष्कार,धरणे आंदोलने,पायी दिंडी,आत्महदहनाचा इशारा,अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने लक्ष वेधण्याचे काम संघटनेच्या वतीने करण्यात आले.

29 जानेवारी 2021पासून हे सर्व शिक्षक वेतनासाठी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करीत होते.गेल्या 52 दिवसांपासून विनाअनुदानित शाळांचे शिक्षक मुंबईतील आझाद मैदानांवर आंदोलन करत होते. या आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आ.डॉ तांबे व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रा प्रकाश सोनवणे यांनी पुढाकर घेतला,मा. मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे,,शिक्षणमंत्री प्रा.वर्षा ताई गायकवाड,अर्थमंत्रीअजितदादा पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटिचे प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले,राज्यमंत्री ज. मो.अभ्यंकर(शिवसेना), म.राज्य काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा बाबासो कुणालजी पाटील,  मंत्री.सुभाष देसाई(शिवसेना) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिक्षकांच्या अनुदानाचा विषय पोटतिडकीने मांडला.व सभागृहात देखील शासनास धारेवर धरले.व अखेर शिक्षकांना न्याय मिळवून दिला.

माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचे आंदोलन चिघळले होते. विनाअनुदानित शाळांचे शिक्षक माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये अशा 27 संघटनांचे शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. काही जणांनी अन्नत्यागाचा मार्गही अवलंबला होता. प्रचलित सूत्राने पगार द्या, अघोषित शाळा निधीसह घोषित करा,अशा मागण्या या शिक्षकांच्या होत्या.सर्वच मागण्या पूर्ण झाल्या नसल्या तरी राज्यसरकार संवेदनशील आहे लवकरच इतर मागण्यांनाही न्याय मिळेल अशी आशा प्रा अनिल परदेशी यांनी व्यक्त केली आहे.

शिक्षकांच्या मागण्यांचे नेतृत्व दीपक कुलकर्णी, के.पी.पाटील, राज्यसमन्वयक अनिल परदेशी, संतोष वाघ,राहुल कांबळे,कर्तारसिंग ठाकूर,महेंद्र बच्छाव,निलेश गांगुर्डे, दिनेश पाटील,प्रा.वर्षा कुलथे,प्रा एन डी पाटील,संजय साळुंके,गुलाबरावजी साळुंखे , यांनी केले.तसेच जेष्ठ शिक्षक प्रा सुनिल गरुड ,प्रा शैलेश राणे यांचे मार्गदर्शन विनाअनुदानित लढ्याला मिळत होते. तसेच या लढ्यासाठी मैदानावर जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी उपस्थिती लावली त्यात प्रा संदीप बाविस्कर ,प्रा.प्रवीण बोरसे,प्रा.प्रेमचंद चौधरी,प्रा.पी एस पाटील,प्रा पी डी निकम,प्रा आर एस पाटील,प्रा प्रशांत पाटील,प्रा सतीश पाटील,प्रा हेमंत भोसले,प्रा एम वाय पाटील,प्रा धैर्यशील  चव्हाण प्रा एम एस पाटील,मयूर सूर्यवंशी,प्रा काशीनाथ पाटील,प्रा रमेश धनगर,प्रा घनश्याम महाले,प्रा दीपक हिरे,प्रा एस जे पाटील,प्रा टी एम पाटील,प्रा नंदू पाटील,प्रा मनोज पाटील, प्रा.तुषार मोरे,प्रा श्रीकांत बोरसे यांचेही मोलाचे योगदान लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.