शासकीय व खासगी आस्थापनांनी त्रैमासिक ई- आर विवरण पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

0

बुलडाणा : सर्व शासकिय, निमशासकिय कार्यालये, खासगी आस्थापना औद्योगीक आस्थापना तसेच अनुदानीत विना अनुदानीत शाळा महाविद्यालये यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय, नवी मुंबई (पुर्वीचे रोजगार व स्वयंरोजगारसंचालनालय) यांनी विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर रोजगार विषयक सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्यात येत आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सर्व उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये यांना रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959 अन्वये या कार्यालयास सादर करावयाची आहे.

माहे मार्च 2021 अखेरचे त्रैमासिक इ आर-1 विवरण पत्र संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे व त्याबाबतचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.  सदर विवरण पत्र सादर करण्याची अंतीम 30 एप्रिल 2021 आहे. त्यानंतर वेबपोर्टलवरील ही सुविधा बंद होणार आहे. कसुरदार आस्थापनावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.  तरी सर्व आस्थापना /उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरण पत्र ऑनलाईन पध्दतीन संकेतस्थळावर सादर करावे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. ऑनलाइन ई आर-1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र .07262- 242342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सु. रा झळके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.