शासकीय मका खरेदी करण्याची भाजपाची मागणी ; तहसीलदारांना दिले निवेदन

0

जामनेर(प्रतिनिधी): – आज 14 रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील दार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले .यात मागणी करण्यात आली की.या वर्षी तालुक्यात मक्याचे उत्पन्न बऱ्यापैकी झालेले असून अद्याप पावेतो शासकीय खरेदी सुरु न झाल्याने शेतकऱ्यांना आपला मका नाईलाजास्तव बाहेरील मार्केट मध्ये,व्यापाऱ्यांना अल्प दराने विक्री करावा लागत आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी नाडला जात आहे. सदर मका शासनाने त्वरित शासकीय भावाने खरेदी केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांची तशी मागणी सुध्दा जोर धरू लागली आहे.यास्तव शेतकऱ्यांचे हित बघता त्वरीत हमी भावाने मका खरेदी करण्यात यावा.ही शेतकरी बांधवांच्या व भाजपा जामनेर तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.तरी आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून मका खरेदी सुरु करावी अन्यथा केंद्र सरकारने परवानगी देऊन सुध्दा, राज्य सरकार मका खरेदीस चाल ढकल करीत असल्याच्या धोरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा निवेदनात इशारा देण्यात आला आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शहर अध्यक्ष अतिष झालटे ,सरचिटणीस रवींद्र झालटे ,न.पा. गट नेते डॉ. प्रशांत भोंडे,जामनेर तालुका इजुकेशन सोसायटी चे सचिव जितेंद्र पाटील,दीपक तायडे,संतोष बारी, न्यानेश्र्वर शिंदे, प्रफुल्ल महाजन,आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.