व्यावसायिक नरेश खंडेलवाल यांचा कार अपघातात मृत्यू

0

जळगाव प्रतिनिधी l येथील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते नरेश खंडेलवाल यांचा कार अपघातात मृत्यू झाला.

नरेश खंडेलवाल हे आपल्या मित्रांसह सुरतहुन जळगाव कडे येत असताना नवापूर जवळ त्यांच्या कार (एम.एच. १९, सी.व्ही. ६३१) ला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात नरेंद्र खंडेलवाल यांच्या डोक्याला जबर फटका बसल्यामुळे त्यांचे निधन झाले. या अपघातात कारमध्ये बसलेले नरेश लक्ष्मीनारायण खंडेलवाल (वय-६५) , त्यांचे मित्र विजय जैन, चालक संजय व त्याचा एक मित्र हे जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी नंदुरबार येथे आणण्यात आले.

दरम्यान नरेश खंडेलवाल यांचे अपघाती निधन झाल्याची वार्ता येतात व्यवसायिक विश्वावर शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.