व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या दोन भामट्यांनी लुटले

0

कजगाव (प्रतिनिधी) : येथुन जवळच असलेल्या तांदुळवाडी ता.भडगाव येथील व्यापारी किराणा माल घेण्यासाठी जात असतांना या व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या दोन भामट्यांनी लुटल्याची घटना कजगाव चाळीसगाव मार्गावर गुरुवारी सकाळी-९ वाजता घडली एकच दिवसापूर्वी चक्क तीन घर फोडत चार ते पाच लाखाच्या चोरीस काहि तास उलटत नाहि तोच दिवसा ढवळ्या व्यापाऱ्यास लुटल्या मुळे मोठी घबराट पसरली असुन चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे.

येथुन जवळच असलेल्या तांदुळवाडी ता. भडगाव येथील किराणा व्यापारी रमेशचंद  धाडीवाल हे नेहमी प्रमाणे सकाळी ९ वाजता आपल्या किराणा दुकानास लागणारा किराणा माल खरेदीसाठी आपल्या दुचाकी ने कजगाव जात असताना. कजगाव चाळीसगाव मार्गावर कजगाव पासुन अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर त्यांच्या मागावून दुचाकी वर आलेल्या दोन भामट्यांनी या व्यापाऱ्यास थांबवत कारे ऐकु येत नाहि काय मी तुला थांबण्यासाठी आवाज दिला तु थांबला का नाहि कजगावात चेकिंग सुरू आहे. तु कुठे चालला कोरोना आहे. कळत नाहि काय असले शब्द प्रयोग करत सुरुवात केली. धाडीवाल यांनी मी तांदुळवाडी चा किराणा दुकानदार असुन दुकानाचा माल खरेदीसाठी कजगाव जात असल्याचे सांगितले मात्र ते न ऐकता तुझ्या थैली मध्ये काय आहे, तुझ्या खिशात काय, आहे चल सर्व काढ आणि ते तुझ्या रुमाल मध्ये टाक पुढे कजगाव मध्ये चेकिंग सुरू आहे  त्या मुळे घाबरलेल्या व्यापाऱ्यांने आपल्या जवळ जे होत ते सारं काढत या प्रमाणे खिशातील व थैली मध्ये असलेले कागदपत्रे व रोख रक्कम घड्याळ व सोन्याची अंगठी काढत दाखविले नंतर या भामट्यांनी धाडीवाल यांच्या डोक्यावर बांधलेला रुमाल खोलायला लावत सारे पैसे व हातातील घड्याळ व अंगठी  या रुमालात बांधतांना हात चलाखी दाखवत कींवा भुरळ टाकत पाच ते सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी पसार केली काम फते केल्या नंतर तुमच्या रुमाल मध्ये  घड्याळ, अंगठी व नोटा बांधून थैलीत ठेवल्या आहेत पुढे पोलिसांची तपासणी सुरू आहे.

सांभाळुन जा कोरोना आहे जास्त बाहेर फिरायचे नाहि अस म्हणत रमेशचंद धाडीवाल यांना पुढील रस्ती मार्गी लावले नी या दोघ भामट्यांनी आपले काम फते करत ते चाळीसगाव च्या दिशेने पसार झाले व्यापारी धाडीवाल हे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पेट्रोलपंप आले नी थैलीत रुमाल टाकला आहे कींवा नाहि त्यात सारे पैसे घड्याळ व सोन्याची अंगठी सहीसलामत आहे कींवा काय या साठी थैली मधुन रुमाल काढला त्यात पैसे व घड्याळ मिळाले मात्र त्यातुन अंगठी गायब झाल्याचे लक्षात आले तर पैसे पुर्ण होते कींवा नाहि हे घाबरलेल्या व्यापाऱ्यास लक्षात आले नाही घाबरलेल्या धाडीवाल यांनी सरळ कजगाव येथे रहात असलेले लहान बंधु पवनकुमार धाडीवाल व पुत्र नितीन धाडीवाल  यांचे कडे धाव घेत सारा घटनाक्रम कथन केल्याने सदर घटना भडगाव पोलीस स्टेशनला कळविण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.