विना अनुदानित शिक्षकांचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना साखळे

0

चोपडा (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र राज्यातील विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे मुंबईतील आझाद मैदानावर २९ जानेवारी २०२१पासून आंदोलन सुरू आहे. नैसर्गिक टप्पा वाढीने १००% अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. १४ दिवस झाले तरी शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्यात शिक्षकांच्या हितासाठी झटणाऱ्या २३ संघटना एकत्र आले असून शिक्षक समन्वय संघाची स्थापना केली आहे.

या शिक्षक समन्वय संघातर्फे चोपडा तालुक्यातील विना अनुदानित शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आज दिनांक १२/०२/२०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंत पाटील साहेब यांना दिले. पुरोगामी महाराष्ट्रात २० वर्षापासून विना अनुदानित शिक्षकांची होत असलेली हेळसांड थांबवावी व दिनांक १३/०९/२०१९ नुसार घोषित अनुदान मंजूर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कॉलेजच्या २०% व २०% अनुदान घेत असलेल्या शाळांच्या ४०% चा टप्पा निधी वितरणाच्या आदेश काढण्यास आपण सभागृहात वारंवार आश्वासित केल्यानुसार याच महिन्यात तात्काळ आदेश काढून प्रचलित वेतन सुरू करावे व अघोषित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कॉलेज तसेच नैसर्गिक वाढीच्या तुकड्या निधीसह घोषित करावे अशी मागणी या निवेदन मध्ये करण्यात आलेली आहे.

यावेळी मुख्याध्यापक श्री व्ही. आर. पाटील, प्रा. डॉ. अझहर शेख, प्रा. अभिजित पाटील, श्री.संजय पाटील, श्री.विजयानंद शिंदे सर यांच्या सह तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील अनेक विनाअनुदानित शिक्षक हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.