विजेच्या धक्क्याने ५ म्हशींचा जागीच मृत्यू

0

जळगाव – चरण्यासाठी गेलेल्या पाच म्हशींचा वीजखांबावरील तुटून जमीनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा जोरदार धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी कुसूंबा शिवारात घडली. या घटनेत एक म्हैस जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

धनराज रामकृष्ण पाटील (वय 60) त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या 40 म्हशी आहेत. धनराज पाटील हे शेती करुन आपला उदरनिर्वाह भागवितात. या म्हशींना घेवून धनराज पाटील हे 5 रोजी कुसूंबा शिवारात घेवून गेले. भास्कर शिवसिंग पाटील यांचे शेताजवळील प्लॉटमध्ये म्हशी चरत असताना याठिकाणी वीजखांबावरील तुटून जमीनीवर पडलेल्या वीजप्रवाह असलेल्या तारेला सहा म्हशींचा स्पर्श झाला. व जोरदार धक्का बसल्याने म्हशी जमिनीवर पडल्या. यात 5 म्हशींचा जागीच मृत्यू झाला. तर एका म्हशीवर कुसूंबा येथीलल डॉ. संदीप पाटील यांनी उपचार केले. दरम्यान, धनराज पाटील यांनी प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्यात कळविला. माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल रतिलाल पवार यांनी घटनास्थळ गाठले. व घटनेचा पंचनाम केला. याबाबत धनराज पाटील यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.