वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

0

भडगांव (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रसार असल्याने या वर्षी भडगाव कमल नगर येथील रहिवाशी जालम विठ्ठल चव्हाण यांची कन्या कु. प्राची चव्हाण हीचा ११ वा वाढदिवस साजरा न करता तो खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आला. नायब तहसिलदार रमेश देवकर यांच्याकडे रु .२१०० रुपयाचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे प्राची चव्हाण हिचा २१ एप्रिल रोजी वाढदिवस साजरी करण्यात येते परंतु  या वर्षी कोरोना या विषाणू ने सर्वत्र थैमान घातले असुन प्राची चा वाढदिवसानिमित्त म्हणून आज नायब तहशिलदार रमेश देवकर यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी  चेक स्वरूपात जमा करण्यात आला यावेळी जालम चव्हाण (वडिल) शोभा चव्हाण (आई )प्रथमेश चव्हाण (भाऊ), बापु शार्दुल, शेखर पाटील, आदी उपस्थित होते. तसेच प्राची ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे जमा केले म्हणून कौतुक करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.