वाढत्या कोरोनामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

0

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले असल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळत आली आहे.

जळगाव शहरातील आठवडी  बाजारावर कोरणाचे सावट आल्याने भरत नसल्याने अशा परिस्थितीमध्ये शेतात पिकविलेला भाजीपाला विकण्यासाठी शेतकरी  भाजी मंडई  दुकाने थाटतात परंतु प्रशासनाचा बडगा, कोरोनाचा प्रादुर्भावामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्याभरात  मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. येथील शेतामध्ये बहुतांश मंडळीचा संसार भाजीपाल्यावर आपला उदरनिर्वाह संसार  चालतात. परंतु बाजार बंद मुळे भाजीपाले विकावे कुठे हा गंभीर प्रश्न समोर आहे

वाढत्या रुग्णसंख्येचा मोठा परिणाम होत असल्याने बाहेरगावचे ग्राहकी मंदावली आहे. गल्लोगल्ली फिरूनही भाजीपाला आपला विकला जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान  यासोबतच काही जण कांदा, लसूण विक्रीचा व्यवसाय करतात. या हातावरील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतामध्ये राबवून कडक उन्हामध्ये उत्पादित केलेला भाजीपाला विकण्यासाठी गल्लोगल्ली फिरावे लागत भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून नाराजी व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.