वाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शोभाबाई पाटील

0

पाचोरा (प्रतिनिधी) : वाडी तालुका पाचोरा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दिनांक २९ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी वरद वाडेकर यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. सरपंच पदासाठी शोभाबाई भिकन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मैनाबाई सुभाष पाटील, कस्तुराबाई रमेश पाटील, डॉ. लक्ष्मण त्र्यंबक पाटील, मिनाबाई रामदास पाटील, प्रकाश एकनाथ पाटील, उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध करण्या साठी अॅड. देवेंद्र किरण पाटील, प्रकाश पाटील, माजी सरपंच रमेश पाटील यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.