मुलीच्या मोबाइलचे सिम कार्ड तोडून जीवे मारण्याची धमकी

0

सात जणांविरुध्द गुन्हा
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील देशमुखवाडी भागात अचानक पणे येवुन अनाधिकृतपणे घरात घुसुन मुलीच्या हातातील मोबाईल हिसकविला व त्यातील सिम कार्ड काढुन ते तोडुन मुलगी जर यापुढे जामनेर येथे गेली तर तिला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याने मुलीच्या वडिलांनी पाचोरा पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेख अनिस शेख अमिर वय – ५५, व्यवसाय – वायरमन, रा. देशमुखवाडी हे दि. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ८:३० वाजता कुटुंबियांसह घरी असतांना संशयित आरोपी आसिफ खान आरिफ खान , शेख कादीर शेख शब्बीर यांचे सह सात जण अनिस शेख यांच्या घरात अनाधिकृतपणे घुसले. व त्यांच्या मुलीच्या हातातील मोबाईल हिसकावुन त्यातील सिम कार्ड तोडुन तिला जर जामनेर येथे पाठविले तर तिस जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी दिल्याने पाचोरा पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजयसिंह राजपुत हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.