वर्डी येथील शेतकऱ्यांचे ना जयंत पाटील यांना निवेदन

0

वर्डी ता चोपडा (वार्ताहर) येथील खडक्या नाल्या जवळ मोठा पाझर तलावा साठी व वर्डी एम एस ई बी लाईट सप्टेशनचा मोठा पावर ट्रांन्सफार्मर मिळावा ह्या करीता ,, महाराष्ट्र राज्यातील मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

वर्डी गावाचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, तरी सातपुडा पर्वताचे वाहुन वाया जाणारे पाण्यासाठी काही तरी उपाय योजना म्हणून  महाराष्ट्र राज्यातील मंत्री  जयंत पाटील यांना वर्डी येथील शेतकर्यांनी निवेदन देऊन ह्या नाल्या लगत मोठा पांझर तलाव निर्माण करावा व वर्डी गावातील व परीसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा अशी विनंती वर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जि प सदस्य विजय पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष लहुश नायदे धनगर, यांनी केली, तसेच ह्या मागणीला शेतकरी संघटनेचे संदीप पाटील  वर्डी वि का सो चे माजी व्हा चेअरमन छोटु शिंदे,रतिलाल पाटील विनायक धनगर सह शेतकर्यांचे स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा परीवार संवाद ह्या कार्यक्रमाला आलेल्या पाहुणे  मेहमूद शेख( प्रदेश अध्यक्ष रा यु ),

धनगर समाजाच्या रणरागिणी युवती प्रदेश अध्यक्षा कु संक्षनाताई सलगर, आमदार  अनिल भाईदास पाटील, अरूणभाई गुजराथी(माजी विधानसभा अध्यक्ष)  चंद्रहास भाई गुजराथी यांनी ह्या निवेदनाला पाठबळ दिले तसेच वर्डी गावातील व पंचक्रोशीतील विजेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, लोड जास्त झाल्या मुळे शेती शिवारातील लाईट ही १० घंटे देण्यात ऐवजी ७ घंटे मिळत आहे, त्या करीता वर्डी येथील लाईट सप्टेशनला मोठा पावर ट्रान्सफारमर मिळावा व वर्डी गावातील व पंचक्रोशीतील शेतकर्यांन करीता १० घंटे लाईट देता येईल अशी विनंती, आदरणीय मंत्री महोदयांना करण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.