वरणगाव आयुध निर्माणीचे गगनभेदी कार्य ; एक कोटीचे ५.५६ एमएमएम १९३ अॅम्युनेशन अमेरीकेला रवाना

0

 वरणगांव : आयुध निर्माणी वरणगांव या रक्षा उत्पादन करणा-या युनिट द्वारे एक कोटी  ५. ५६ एम , एम  एम १९३ अॅम्युनेशन चे गुणवत्ता पुर्ण उत्पादन करुन अमेरिका येथे आज रवाना करण्यात आले. अमेरीकेतील प्रायव्हेट फर्म द्वारे या अॅम्युनेशन ची ऑर्डर दिली होती. या कामगीरीमुळे आयुध निर्माणी वरणगांव गुणवत्तापूर्ण युध्द सामुग्रीचे उत्पादन करणारे युनिट म्हणुन आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगांव द्वारा १०० लाख आणी

अॅम्युनेशन फॅक्टरी खडकी द्वारा १४ लाख असा एकुण ११४ लाख माल महाप्रबंधक सुशांत कुमार राऊत व अप्पर महाप्रबंधक राजीव गुप्ता यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखउन गाड्यांचा ताफा चेन्नई येथे रवाना झाला. चेन्नई पोर्ट वरुन जहाजा द्वारे अमेरीकेला जाईल. या अॅम्युनेशन च्या गुणवत्ता पुर्ण उत्पादनाबद्दल महाप्रबंधक एस.के.राऊत यांनी सर्व कर्मचारी, अधिकारी व स्टाफ चे अभिनंदन केले आहे. व पुन्हा पुढील 100 लाख ची ऑर्डर जुलै अखेर पर्यंत पुर्ण करण्यासाठी कर्मचा-यांना आवाहन केले आहे.

या प्रसंगी भारतीय मजदूर संघाचे योगेश सुर्यवंशी, बी.बी.सपकाळे, विजय जगताप, सचिन चौधरी, इंटक युनियन चे रविंद्र देशमुख, महेश पाटील व कामगार युनियनचे विशाल भालशंकर, संदिप पाटील.

व कार्यप्रबंधक श्री.विजय कुरारीया व सर्व अधिकारी अनुभाग प्रमुख उपस्थित होते.

या कामगीरीमुळे अन्य राष्ट्रातर्फे देखील आयुध निर्माणी च्या मालासाठी एन्क्वायरीज प्राप्त होत असुन मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी प्रॉडक्शन युनिट सज्ज आहे.

तरीही एवढ्या उच्च प्रतिचे रक्षा उत्पादन करत असुन सरकार द्वारे सुध्दा आयुध कारखान्यांचे निगमीकरण करण्याचा सरकारचा बेत असल्याने समस्त कर्मचा-यांमध्ये तिव्र असंतोष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.