वरणगावात प्रविण दरेकरांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

भाजपचे नेते  प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तसेच महिलांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीने  वरणगाव शहरातील बस स्टँड चौकात दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.

विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेता भाजप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे. अशाप्रकारे पक्षाचा तसेच महिलांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून भुसावळ तालुक्यातील वरणगाव राष्ट्रवादी कॉग्रेंस महिला आघाडीच्या दरेकरांच्या फोटोवर  जोडे मारो आंदोलन करीत.  मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देत भाजपचा निषेध असो, महिलांचा अपमान करणार्‍यांचा निषेध असो, आशी  घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.

यावेळी जळगाव जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष. वंदना चौधरी, प्रतिभाताई तावडे, रंजना  पाटील, अरुणाबाई  इंगळे, रोहिणी  जावळे, नसरीन बी साजिद कुरेशी, वैशाली मराठे, प्रतिभा सोनवणे सुरळकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष  वाय. आर. पाटील सर, .दीपक भाऊ मराठे, पप्पू भाई जकातदार, प्रकाश नारखेडे, कैलास माळी, सुधाकर  जावळे, अनिल चौधरी, रवि पाटील, इफ्तेखार मिर्झा, जितू मराठे, शेख रिजवान, महेश सोनवणे, सोहेल कुरेशी, पिंटू धोबी, कौस्तुभ पाटील, राजेश इंगळे सर, जितेंद्र तावडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.