वडगाव बु येथील प्रताप माध्यमिक विद्यालय कोरोना विरुद्ध लढण्यास सज्ज

0

भातखंडे (प्रतिनिधी) : दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्यु. को- ऑप. सोसा. लि.शेंदुर्णी संचलित प्रताप माध्यमिक विद्यालय वडगाव बुद्रुक येथे कोरोना विषाणूमुळे पूर्ण जगावर महामारी चे संकट ओढवले आहे सन २०२०/२१ या शैक्षणिक वर्षातील शाळा कॉलेज यांचे नियोजन विस्कळीत झालेले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची व आरोग्याची चिंता सर्व अधिकारी पदाधिकारी संस्थाचालक यांच्यासमोर संकट रूपाने उभे आहे अशा प्रसंगी संस्थेचे कर्तव्यदक्ष व दूरदृष्टी असलेले चेअरमन संजयराव गरुड, चेअरमन प्रतिनिधी संजयजी देशमुख, ज्येष्ठ संचालक यु  यु पाटील सहसचिव, दीपकजी गरुड यांच्या कल्पकतेतून विद्यालयास वर्ग व परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी चार्जिंगचा फवारणी पंप, सोडियम हायड्रोक्लोराइड रसायन, सॅनिटायझेशन स्टॅन्ड, सॅनिटायझर , तापमापक हे सर्व साहित्य मान्यवरांच्या हस्ते विद्यालयास सुपूर्त करण्यात आले. यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होईल असे आश्वासन विद्यालयाचे मुख्याध्यापक- . पी. एल. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांच्यावतीने देण्यात आले. गावातील व परिसरातील पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.