रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैध, पण……

0

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित राजेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. हे रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नसून अपक्ष म्हणून उभा राहिले होते. कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १६ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

त्यांचा उमेदवारी अर्ज प्रतिज्ञापूर्ण अपूर्ण असल्याने बाद ठरवण्यात आला आहे. एकसारख्या नावाचा गैरफायदा उठवत डमी उमेदवार उभा करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यामुळे फसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

कर्जत-जामखेड या विधानसभा मतदार संघाातून शरद पवारांचे नातू रोहित राजेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासारखेच नाव असलेल्या दुसऱ्या उमेदवारानेही अर्ज केला. निवडणुकीत मतदारांची गल्लत करण्यासाठी प्रमुख उमेदवारासारखे नाव असलेल्या व्यक्तींना मुद्दाम उभे करण्याची जुनीच पद्धत आहे. तसाच प्रकार या मतदारसंघात झाला. मात्र, प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याच्या मुद्द्यावर बीडच्या रोहित पवार यांचा अर्ज फेटाळला गेला. त्यामुळे एकसारख्या नावाचे दोन उमेदवार रिंगणात आणण्याचा प्रयत्न फसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.