रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, 9000हुन अधिक स्पेशल ट्रेनला मंजुरी

0

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने 70 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णया अंतर्गत रेल्वे येत्या दोन आठवड्यात आणखी 133 गाड्या चालविण्याचा विचार करीत आहे. त्यापैकी 88 ट्रेन समर स्पेशल तर 45 ट्रेन खास उत्सवासाठी असणार आहेत. याबाबतचा आदेश बुधवारी जारी करण्यात आला. या आदेशात 9,622 विशेष ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे. दररोज सात हजाराहून अधिक ट्रेन देशभरात धावतील. कोरोना महामारी पूर्वी दररोज सरासरी 11 हजार 283 गाड्या रुळावर धावत होत्या सध्या देशात पाच हजार 387 उपनगरी गाड्या धावत आहेत. यातील सर्वाधिक गाड्या मध्य रेल्वे क्षेत्र अंतर्गत आहेत. यात मुंबई व पुणे या भागांचा समावेश आहे.

मध्य रेल्वे क्षेत्रात सध्या 82 टक्के मेल-एक्सप्रेस आणि 25 टक्के लोकल गाड्या सुरू आहेत. रेल्वे ने घेतलेला हा निर्णय आश्‍चर्यकारक असल्याचे म्हटले जात आहे. कारण कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने लॉकडाउनच्या भीतीने प्रवासी कामगार मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे प्रवास करतात अशा विविध भागांमध्ये करुणा रुग्णांची संख्या आणखीनच वाढत असल्याची स्थिती आहे.

दरम्यान मागील 24 तासात देशात दोन लाख 16 हजार 850 नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना बाबत देशाची चिंता आणखीनच तीव्र झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.