रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! मिळणार ‘ही’ खास सेवा

0

मुंबई : धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये विना अडथळा अर्थात बफरमुक्त मनोरंजनासाठी आता प्रवाशांना लोकलमध्ये वायफाय सेवा उपलब्ध होणार आहे.मार्चअखेरीस मुंबई लोकलसह मेल-एक्स्प्रेसमध्ये ‘कंटेंट ऑन डिमांड’ अंतर्गत वायफाय सेवा पुरवण्याचा निर्णय ‘रेलटेल’ने घेतला आहे. यामुळे लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना मनोरंजनकाचा नवीन अनुभव घेता येणे शक्य आहे.

 

भारतीय रेल्वेला स्मार्ट रेल्वे बनविण्याकरिता धोरणात्मक बदल करण्यात येत आहे. रेल्वेगाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना कंटेंट ऑन डिमांड अतंर्गत सर्फिंग, माहितीपट, चित्रपट, संगीत, गाणी यांचा लाभ घेता येईल. टप्याटप्याने बहुभाषक मनोरंजनाचा पर्याय देखील प्रवाशांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यानी दिली.

 

मुंबई लोकलसह, प्रीमियम-मेल-एक्स्प्रेसमध्ये सीओडीनुसार वायफाय सेवा सुरू करण्यात येणार आहे. टप्याटप्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात १० ते १२ लोकल गाड्यांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. याचबरोबर चेन्नई एक्स्प्रेसमध्ये देखील या प्रकारच्या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.