रेणुका हायस्कूलमधील बोअरवेल मोटारसह साहित्य चोरट्यांनी लांबविले

0

बोदवड – शहरातील रेणुका नगरात असलेल्या रेणुका माध्यमिक विद्यालयातील पिण्याच्या पाण्याची करण्यात आलेल्या बोअरवेलची मोटार व केबल,दोर असा अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली असून याप्रकरणी बोदवड पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक श्री.धनगर सर यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपूर्वी शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक तथा उपशिक्षक यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे विद्यार्थ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बोअरवेलची मागणी केली होती.याची दखल घेत बोदवड नगर पंचायत प्रशासनाने विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होत असलेले हाल पाहता शाळेत बोअरवेल करून दिली आहे.मात्र दि.१९ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बोअरवेलची मोटार,२५० फुटांचा पाईप,दोर असा अंदाजे ४० ते ५० हजार रुपये किंमतीचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.