राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संसदेत गदारोळ

0

नवी दिल्ली :  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्यावरून आज शुक्रवारी लोकसभेत गदारोळ पहायला मिळाला. यावेळी स्मृती इराणी यांच्यासह भाजपाच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

राहुल गांधी नेमका काय संदेश देऊ पाहताहेत. त्यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे. गांधी घराण्यातील एखाद्या सदस्यांनं असं वक्तव्य करणं हे लज्जास्पद आहे,  स्मृती इराणी यांची टीका केली आहे.  राहुल गांधी यांनी गुरूवारी झारखंडमध्ये एका रॅलीला संबोधित केलं होतं. त्यावेळी बोलताना ‘मेक इन इंडिया’ आता ‘रेप इन इंडिया’ झाल्याचं ते म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.