राष्ट्रीय महिला आयोगतर्फे महिलांसाठी डिजिटल वर्क शॉप शिबीर

0

चोपडा(प्रतिनिधी) : राष्ट्रीय महिला आयोग तसेच पेडकाई देवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था आयोजित डिजिटल वर्क शॉप शिबीराचे उद्घाटन रविवारी चोपडा येथील नारायणवाडी सकाळी ११ वा करण्यात भाजपा जि.प.सदस्य ज्योती राकेश पाटील, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

डिजिटल वर्क शॉप प्रशिक्षका पल्लवी सोमवंशी यांनी सुमारे २५० आशा स्वयंसेविका तसेच ग्रामपंचायत ग्रामसेविका यांना २१ व्या शतकात डिजिटल पद्धधतीने करण्यात येणाऱ्या कामाबद्दल येणाऱ्या अडचणी त्यावर करायचा उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शिवसेना महिला तालुकाप्रमुख मंगलाताई पाटील,उषा बोरसे,शितल पाटील,प्रोफेसर सुरेश पाटील,पेडकाई देवी संस्थाचे अध्यक्ष जगदीश बोरसे,आनंद बोरसे यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. यावेळी टेक्निकल प्रशिक्षक प्रविण पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.