राष्ट्रीय एरीयल स्पोर्ट्स स्पर्धेत जळगाव संघाला एक रजत , दोन कास्य पदक

0

 जळगाव | प्रतिनिधी 

उत्तरप्रदेश झांसी सी दिनांक २९ मे ते १ जुन २०१९ दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय एरीयल स्पोट्स स्पर्धेत ११ राज्या मधील एकुण ४५० खोळाडुंनी आपला सहभाग नोंदविला त्यात  जळगाव च्या खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत एक रजत दोन कास्य पदक प्राप्त केले.


त्यात वरणगाव च्या महात्मा गांधी विदयालयाचे विदयार्थी वैयक्तिक खेळ प्रकारात चेतन भुषण मानकरे याने १४ ते १७ वयोगटात २० पैकी १७ गुण प्राप्त करून रजत पदक मिळविले व सागर किशोर चौधरी याने २० पैकी १६.९० गुण प्राप्त करून कास्य पदक पटकावले. तर जळगाव शहराच्या सेंट टेरेसा स्कुल ची विद्यार्थीनी तनिष्का संजय महाजन हिने  मिश्रदुहेरी गटात २० पैकी १६ गुण प्रप्त करून कास्य पदक मिळविले.
विजेत्या स्पर्धकांना राष्ट्रिय एरीयल स्पोट्स असोसिएशन चे राष्ट्राध्यक्ष संजु भाई सारंगी तसेच सचिव सुनिल गंगावणे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह , पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात  आले.
यशस्वी खेळाडूंना  जळगाव जिल्हा एरीयल स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव नरेंद्र भोई , तांत्रीक समीती अध्यक्ष योगेश भालेराव , प्रशिक्षक योगेश भोई यांचे मार्गदर्शन लाभले सर्व विजेत्या खेळाडूंचे जळगाव जिल्हा एरीयल स्पोट्स असोसिएशन चे अध्यक्ष मनोज आडवाणी , उपाध्यक्ष प्रविण पाटील ,  सहसचिव विजय विसपुते ,सुभाष चौधरी ,बंटी नेरपगारे आदींनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.