राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळून निषेध

0

अमळनेर :- राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे पाडळसरे धरणाला निधी देण्यात,अमळनेर तालुक्यावर अन्याय केल्यामुळे शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला. दुपारी 12 वाजता येथील बळीराजा चौकात पोस्टर जाळून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी धिक्काराच्या घोषणा करून जलसंपदामंत्र्यावर रोष व्यक्त केला.

राज्याच्या राज्य अर्थ संकल्प अधिवेशन 2019 अर्थसंकल्पात पाडळसरे धरणाला अवघा 32.50 कोटी इतका तुटपुंजा निधी देण्यात आला. त्यामुळे अमळनेर तालुक्याचा जनतेवर अन्याय झाला व निराशा झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानुसार धरणाला निधी कमी पडू देणार नाही. तसेच गिरीश महाजन यांनी संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढला होता. त्यावेळी भ्रमणध्वनीद्वारे मोर्चेकर्‍यांना आश्वासन दिले होते. त्यात धरणाला 2300 कोटी रुपये निधी तात्काळ उपलब्ध करून देतो आणि धरणाचे काम पूर्ण करू असे सांगितले होते. याचा प्रत्यय कालच्या अधिवेशनामध्ये आला. महाजन यांचे आश्वासन फोल ठरले. धरण होईल, अशा जनतेचे आशा मावळल्या. या गोष्टीचा तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी रस्त्यावरती आंदोलन करण्यासाठी उतरावे लागले व या शासनाला जनता येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शासनाचा, स्थानिक दोन्ही निष्क्रिय आमदारांचा निषेध करण्यासाठी व जलसंपदामंत्री जाहीर निषेध करून प्रतिकात्मक पुतळा जाळला तसेच पाडळसरे संघर्ष समिती तिच्या उद्याच्या जेल भरो आंदोलनासाठी सहभागी होणार व पाठींबा देणार असल्याचे जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांनी यावेळी सांगितले.

शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील, विधान क्षेत्रप्रमुख भागवत पाटील शहराध्यक्ष मुक्तार खाटीक संजय पूनाजी पाटील, पं.स. सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा योजना पाटील, आशाताई चावरीया, अलका पवार, हिम्मत पाटील, युवक शहराध्यक्ष बाळू पाटील हर्षल पाटील, गौरव पाटील गुलाब पिंजारी, अबिद मिस्तरी, सुभाष बापू, रणजीत पाटील, भैय्यासाहेब पाटील, निलेश देशमुख, अरुण पाटील, इमरान खाटीक, सुनील शिंपी, कर्तारसिंग, राहुल गोत्राळ, नरेंद्र पाटील संभाजी पाटील, भुरा पारधी, वसीम पठान, बाळा शेख , सोनू पाटील, संभाजी पाटील, महेश पाटील, सुनील पाटील, गजेंद्र पाटील, संजय पाटील, श्याम पाटील, सनी गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.