राष्ट्रवादीला धक्का ! आ.अवधून तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार

0

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पक्षांतराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे अनेक नेते एकामागोमाग एक शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांमध्ये आता तटकरे कुटुंबातील सदस्याचाच समावेश आहे. खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आमदार अवधून तटकरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

दरम्यान, अवधूत तटकरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे याआधीही अवधूत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.